सीएमएसटी पूल दुर्घटना : कुणाची जबाबदारी हे संध्याकाळपर्यंत ठरवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश 

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिमालया पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत ३२ जण जखमी झाले आहेत. यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. शिवाय पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्चित करा आणि याबाबतचा आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असूनही अशा घटना होणे दुर्दैवी आहे. यामुळे या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. पुलाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1106415634621960192

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)