लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीबाबत वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगी म्हणाले की, 2024 मध्ये भाजपला 2019 पेक्षा यूपीमध्ये जास्त जागा मिळतील.
बिहारच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात जात सर्वेक्षण करण्याबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जात जनगणना हा राज्य सरकारांचा विषय नाही. ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. याबाबत केंद्र सरकार आणि जनगणना आयोग जो काही निर्णय घेईल, उत्तर प्रदेश सरकारही त्याचे पालन करेल. सीएम योगींनी बॉयकॉट संस्कृतीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, कोणताही कलाकार, लेखक किंवा विशेष प्रतिभा असलेल्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे आणि आम्ही करतो.
सीएम योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे स्वतःचे चित्रपट धोरण आहे. राज्यात पूर्वीपेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याचेही भान चित्रपट दिग्दर्शकाला ठेवावे लागते. चुकून चूक झाली असेल तर ती वेगळीच बाब आहे. पण मुद्दाम असे दृश्य देऊ नका ज्यामुळे वाद निर्माण होईल आणि जनभावना दुखावल्या जातील.