लखानौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी विभागाकडून १ कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या उपकरणांची खरेदी केली जाणार आहे. विविध दहशतवादी संघटना तसेच राष्ट्रविरोधी शक्तींकडून योगी यांना असलेला धोका ध्यानात घेत हा निर्णय घेतला गेला आहे. सध्या योगींना झेड प्लस सुरक्षा आणि एनएसजी कमांडोंचे संरक्षण आहे.
योगी राज्यातील विविध जिल्ह्यांचे जेंव्हा दौरे करतील त्यावेळी त्यांची सुरक्षा अधिक मजबुत केली जाईल. त्यात ड्रोन, बॉडी वॉर्न कॅमेरा, ड्रेस कॉम आणि नाइट व्हीजन आदींचा समावेश असेल. मुख्यमंत्र्यांसोबतच राज्यपालांचीही सुरक्षा वाढवली जाणार आहे.