लखनऊ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे काका राजेंद्र सिंह बिष्ट यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षाचे होते.
अनेक दिवसांपासून आजारी असलेले बीष्ट यांनी नवीन नगर येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा दीपक बिष्ट यांनी मुखाग्नी दिला. यावेळी महापौर संजीव वालिया, दंडाधिकारी सुरेश कुमार सोनी यांसह अनेक जण उपस्थित होते. डीएम अखिलेश सिंह आणि एसपी डाॅ एस चन्नप्पा यांनी परिवाराचे सांत्वन केले.