-->

औरंगजेब ‘सेक्‍युलर’ नव्हता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला ‘फटकारले’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्‌विटर हॅंडलवर औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख झाल्याने कॉंग्रेसने त्याला आक्षेप घेतला आहे. मात्र, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला चांगलेच फटकारले आहे.

संभाजीनगर असा ट्‌विटर हॅंडलमध्ये उल्लेख केला तर त्यात नवीन काय आहे? असा सवाल करतानाच औरंगजेब हा सेक्‍युलर नव्हता. आघाडीच्या अजेंड्यात सेक्‍युलर हा शब्द असून त्यात औरंगजेब बसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.

वसंत गीते आणि सुनील बागुल या नाशिकमधील नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला फटकारले. राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे कॉंग्रेसला फटकारल्याने आश्‍चर्य व्यक्त केलं जात आहे.

जे वर्षानुवर्षे बोलतोय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो उल्लेख केला, तेच ट्‌विटरवर लिहिलंय, असं सांगतानाच औरंगजेब काही सेक्‍युलर नव्हता. आमच्या अजेंड्यात सेक्‍युलर शब्द आहे. त्यात औरंगजेब बसत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.