मुंबई, – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील दुखण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ठाकरे यांना बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल केले होते.
ठाकरे यांच्यावर सकाळी साडेसात वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली होती. सुमारे तासभर ती चालली. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुढील आठवड्यात त्यांची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाइन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.
या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ. अजित देसाई हे हृदयरोग तज्ज्ञ असून, डॉ. शेखर भोजराज हे स्पाइन सर्जन आहेत.