‘मुख्यमंत्री स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून’

निलेश राणे यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यानुसार १५ कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुखमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे म्हणाले कि, स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री म्हणाले, सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक होते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या करोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.