“सीएम साहेब, लोकांना ‘शिव पंख’ लावून दिले, तर त्यांना कामावरही जाता येईल”; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले  निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले.  मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घुलन दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत,  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच मुद्द्यावरून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला लगावला आहे. कार्यालये सुरू केली, पण लोकल बंद. आमचा सीएम जगात भारी”, असे म्हणत मनसेने सडकून टीका केली आहे.

राज्य सरकारच्या या भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. “सीएम साहेब, आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो, गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे; या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण शिव पंख’लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे, आपण हे करू शकता. आमचा सीएम जगात भारी”, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निर्बंध उठवण्याचा निर्णय होण्याच्या काही दिवस आधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लोकांना प्रवास करताना त्रास होत असून, दोन डोस घेतलेल्यांना तरी प्रवासास परवानगी द्या अशी मागणी केली होती. त्याचबरोबर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र सरकारकडून त्यांच्या मागणीचा कोणताही विचार केला नसल्याने पक्ष आता नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.