नवी दिल्ली – देशातील तीन प्रमुख राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही मुख्यमंत्र्यांना ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्टॅलिन आज 69 वर्षांचे झाले आहेत.
1 मार्च 1953ला त्यांचा जन्म झाला होता. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (जन्म 1 मार्च 1951) आज 71 वर्षांचे आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (जन्मदिवस 1 मार्च, 1963) 59 वर्षांचे झाले. राज्यातील तीन मुख्यमंत्र्यांचे वाढदिवस एकाच तारखेला येणे हा योगायोग मानता येईल.
पीएम मोदींनी तिन्ही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. आपल्या संदेशात पंतप्रधानांनी तिन्ही मुख्यमंत्र्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्टॅलिन यांना दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले, “तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.”
तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदींनी स्टॅलिन यांच्याशी फोनवरही चर्चा केली आणि त्यांचे अभिनंदन केले. तमिळनाडूच्या विकासासाठी स्टॅलिन यांनी काम करत रहावे अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.