मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेल नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. रंगोली नेहमीच सोशल माध्यमांमध्ये आपल्या बेधक आणि टीकात्मक प्रतिकिया शेअर करत असते. बऱ्याच वेळा ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. पण अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. यातच  रंगोलीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता हॉटेलमध्ये १०,००० खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी हॉस्पिटलमध्ये देखील १०,००० खोल्या करोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार ठेवल्या आहेत. रंगोलीने योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाला पाठिंबा देत ट्विट केले.

रंगोलीने ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे’ असे ट्विट केले होते. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि तिला पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले आहे.’   असं ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.