मुख्यमंत्र्यांनी साधला ‘शिवभोजन’ लाभार्थ्यांशी संवाद

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नाशिक येथील शिवभोजन केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला.

शिवभोजन थाळीबाबत समाधानी आहात का ? असा प्रश्न केल्यावर तुकाराम नाडे भावुक झाले. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता आल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार, माजी खासदार समीर भुजबळ, बचतगट अध्यक्षा अलका चहाळे, मंगला चहाळे आदी नेते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.