एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत काही आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत पाठींबा दिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेत बोलताना शिंदे यांनी जोरदार फटकेकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचा दाखल देत शिंदेंना टोला लगावला होता.
रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना टोला लगावला. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये झालेल्या संवादरम्यान शिंदेंवर टीका केली होती. तर याला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी ट्विट केलं. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार ! अशा आशयाचे ट्विट शिंदे यांनी केले आहे.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
एकनाथ शिंदे हे राजकारणात येण्यापूर्वी रिक्षा चालवायचे त्यामुळे ठाकरेंनी आपल्या मार्मिक शैलीत रिक्षावरून त्यांना टोला लगावला. तर शिंदे यांनी देखील ठाकरेंकडे मर्सिडीज आहे म्हणून त्याचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले.