शिराळा – महायुतीचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवार, दि. 15 रोजी कामेरी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती युवा नेते रणधीर नाईक यांनी दिली.
रणधीर नाईक म्हणाले, गेल्या 5 वर्षात महायुतीच्या सरकारने शिराळा विधानसभा मतदारसंघात भरघोस निधी देऊन रखडलेला विकास मार्गी लावला आहे. ही विकासकामे पूर्णत्वास नेऊन आणखी नवी विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी आपल्या विचाराचे विकासनिधी देणारे सरकार सत्तेवर पुन्हा आणणे गरजेचे आहे.
याकरिता मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी मंगळवार दि. 15 रोजी दुपारी 1 वाजता कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे. याकरिता मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.