-->

लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरलो – अशोक गहलोत

जयपुर – लोकांच्या अपेक्षांवर आम्ही खरे उतरलो असून राजस्थानच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आम्ही उत्तम कामगीरी केली आहे, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. गहलोत यांच्या सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने ट्विटरवर दिलेल्या संदेशात त्यांनी हा मुद्दा नमूद केला आहे.

करोनाच्या काळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावाही गेहलोत यांनी या संदेशात केला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आम्हीं वेळेवर उपाययोजना सुरू केल्या त्याचे चांगले परिणाम दिसून आले. लॉकडाऊन मुळे अर्थकारणाला मोठा फटका बसला असला तरी ती परिस्थितीही आम्ही सक्षमपणे हाताळली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील गरजु लोकांपर्यंत तसेच स्थलांतरीत मजुरांपर्यंत अन्न पोचवण्याच्या कामात राज्य सरकारने उत्तम कामगीरी केली आहे, असेही गहलोत यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.