पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील प्रकार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 9 मध्ये शनिवारी रात्री एक विद्यार्थ्याने मद्यप्राशन करून वसतिगृहात आला होता. ही बाब अन्य निदर्शनाच विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी त्या विद्यार्थ्याना ताब्यात घेतले. या प्रकाराने या वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.
मद्यप्राशन करून वसतिगृहात आल्याची माहिती विद्यापीठाची सुरक्षारक्षकांना प्राप्त झाली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्याला आवाज देऊन खोलीचे दार उघडण्यास सांगितले; परंतु आतून दार उघडले जात नव्हते. दार उघडायला उशीर लागत असल्याने तेथे इतर विद्यार्थी जमा झाले. काही तरी विपरीत घडू नये यासाठी सुरक्षा सक्षकांनी लाथ व धक्के मारून दार उघडण्याचा प्रयत्न केला, धक्के मारण्यात आले. तरीही आतीमधील विद्यार्थी दार उघडत नव्हते.
अखेर खोलीच्या खिडकीची काच फोडून आतमध्ये काय सुरू आहे हे पाहिले. त्यानंतर खोलीचे दार उघडून बाहेर आल्यानंतर तिघांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेऊन बाहेर नेले. घटनास्थळी पोलिस पोहोचले असता, त्यांनी या विद्यार्थ्यांचा जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यापीठात सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. वसतीगृहातील गैरप्रकारासह भांडण, गोंधळ कमी करण्यासाठी पॅरासाईट विद्यार्थी बाहेर काढले आहेत, यासह विद्यापीठात सुरक्षेसाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. तरीही विद्यापीठात मद्यप्राशन केल्यामुळे गोंधळ होत असल्याच्या घटना होत असल्याचे दिसून येत आहे.
“वसगीतगृहात दारूची पार्टी झाली नाही, तर हा विद्यार्थी बाहेरूच मद्यप्राशन करून आला होता. इतर दोघांनी काहीही केले नव्हते. या प्रकारामुळे त्याचा वसतिगृहातील प्रवेश रद्द केल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.