पुणे – शहरात मंगळवारी ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. वातावरणातदेखील उकाडा आणि गारवा होता.
बुधवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. तर शहरात आकाश अंशत: ढगाळ राहून, मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागील 24 तासांत पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. शहरात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावरील चक्रीय चक्रवात आता विदर्भ आणि लगतच्या भागावर आहे. यामुळे विचित्र वातावरणीय स्थिती निर्माण झाली आहे.