पकिस्तानवर संकटाचे ढग ; सावध राहण्याची वेळ – शाह महमूद कुरेशी

इस्लामाबाद: पाकिस्तानवर संकटांचे गहिरे ढग भरून आले आहेत. अशा शब्दात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताने केलेल्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करत जवळपास ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. यामध्ये अझर मसूदचा मोठा भाऊ अझहर खान देखील ठार झाला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले, की मी देशापासून काहीही लपवू इच्छित नाही. आज देशावर संकटाचे ढग भरून आलेले आहेत. सावध राहण्याची वेळ आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.