भारत आणि रशियामध्ये घनिष्ठ मैत्री !- नरेंद्र मोदी

जोहानिसबर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स संमेलनादरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि रशियामध्ये घनिष्ठ मैत्री आहे.

नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची अनौपचारिक मुलाखत याआधी सोच्चि मध्ये झाली होती. चीन मध्ये आयोजित शंघाई कॉरपोरेशन ऑर्गेनाइजेशन मध्ये यांची भेट झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नरेंद्र मोदी म्हणाले, “राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत अनेक मुद्दयांवर रचनात्मक चर्चा झाली. रशिया सोबत भारताची मैत्री घनिष्ठ असून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही सोबत काम करू”

नरेंद्र मोदी दोन दिवसीय ब्रिक्स संमेलनात भाग घेण्यासाठी बुधवारी जोहानिसबर्ग येथे गेले आहेत. यावर्षी संमेलनाची थीम ‘ब्रिक्स इन अफ्रीका’ अशी आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये झाली होती. ब्राजील,रशिया , भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका याचे सदस्य आहेत.

https://twitter.com/PMOIndia/status/1022585169960681473

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)