श्रीकांत जाधव यांची खडतर मार्ग निवडत माऊंट किलीमांजारोवर चढाई

आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर्वात वेगात केला सर

पिंपरी -आफ्रिका खंडातील सर्वोच्च आणि चढण्यासाठी अतिशय अवघड मानले जाणारे किलीमांजारो शिखरावर गिर्यारोहक श्रीकांत जाधव प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकविला. फिनोलेक्‍स इंडस्ट्रीजचे कर्मचारी जाधव यांनी 5 हजार 895 मीटर उंचीचे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर 26 जानेवारी रोजी सर केले. आफ्रिकेतील हे सर्वोच्च शिखर सर्वांत लवकर सर करण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.

अतिशय प्रतिकूल वातावरण, वेगाने वाहणारे वारे, उणे 15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला पारा, अशा खडतर परिस्थितीत श्रीकांतने या शिखराला गवसणी घातली. आफ्रिकेतील हे सर्वोच्च शिखर सर्वात लवकर सर करणारा श्रीकांत जाधव हा पहिलाच गिर्यारोहक ठरला. ज्या खडतर मार्गाने गिर्यारोहकांनी शिखरावर पोहचण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्याच मार्गाने श्रीकांत यांनी अवघ्या पाचच दिवसात एकट्याने हे शिखर सर केले.

अनेक गड किल्ले, सुळे, हिमालयातील उंच शिखरे यावर श्रीकांतने चढाई केलेली आहे. जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टच्या बेसकॅम्प पर्यंतही श्रीकांत पोहचले आहेत. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हे एकट्याने सर करण्याचा निर्धार यावर्षी श्रीकांत यांनी केला. यासाठी त्यांनी “मचाने मे’ हा खडतर मार्ग निवडला. या मार्गावरून शिखर सर करण्यासाठी सात दिवस लागतात परंतु श्रीकांतने अवघ्या पाच दिवसांमध्ये हा टप्पा पूर्ण केला. यासाठी श्रीकांतला स्थानिक गाईड मुसा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या वर्षात सर्वात लवकर हे शिखर सर करण्याचा मान श्रीकांतने पटकावला. या मोहिमेसाठी श्रीकांतला एवरेस्टवीर श्रीहरी तापकीर कामगार नेते अरूण बाऱ्हाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फांउडेशनचे सर्वेसर्वा प्रकाश छाब्रिया, रितू छाब्रिया यांनी श्रीकांत जाधव यांच्या या आंतरराष्ट्रीय मोहिमेचे पालकत्व स्वीकारले. फिनोलेक्‍स इंडस्ट्रीजच्या व्यावसायिक विभागाचे उपाध्यक्ष भानुदास मेहता यांचेही मार्गदर्शन श्रीकांत यांना मिळाले. आता लवकरच जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार श्रीकांतने व्यक्त केला आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.