साताऱ्याच्या प्रियांका मोहितेकडून अन्नपूर्णा शिखरावर चढाई

सातारा –  सह्याद्रीकन्या प्रियांका मंगेश मोहिते हिने आज (दि. 16) दुपारी 1 वाजता जगातील दहाव्या क्रमांकाचे उंच असलेले माऊंट अन्नपुर्णा-X हा 8095 मीटर उंचीचा पर्वत यशस्वीपणे पदाक्रांत केला. हे साहस पुर्ण करणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय महिला ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे साहस पुर्ण करून ती लगेचच माऊंट धौलागिरी हे जगातील सातव्या क्रमांकाचे 8167 मीटर उंचीचे शिखर आरोहणास जाणार आहे. आतापर्यंत तीने माऊंट एव्हरेस्ट, माऊंट लोत्से माऊंट मकालू हे पर्वत सर केले आहेत.

सह्याद्री कन्या प्रियांका मोहिते हिचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले आहे. माउंट मका लू व माउंट चो यू ही आठ हजार मीटर उंचीपेक्षा जास्त शिखरे प्रियांकाने सर केली आहेत. जगातील सातव्या क्रमांकाचे 8167 मीटर उंचीचे धौलागिरी शिखर पादाक्रांत करण्यास जाणार असल्याचे मंगेश मोहिते यांनी प्रभात शी बोलताना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.