वातावरणातील बदलाचा फळांच्या आवकवर परिणाम

मकरसंक्रांत व शाळा सुरू झाल्याने बोरांना मागणी

 

पुणे – वातावरणातील बदलामुळे फळांची आवक घटली आहे. तरीही मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे बहुतांश फळांचे भाव स्थिर आहे. गुरुवारी (दि.14) मकरसंक्रांत व शाळा सुरू झाल्याने बोरांना मागणी वाढली आहे.

त्यातुलनेत आवक कमी असल्याने भावात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, मागणी अभावी खरबूजाचे भाव प्रतिकिलोमागे 5 रुपयांनी घटले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबाची आवक किंचत घटल्याने भाव प्रतिगोणीमागे 50 रुपयांनी वाढले आहेत.

फळांचे भाव

लिंबे (प्रति गोणी) : 300-400, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 300-500, (4 डझन) : 180, संत्रा : (10 किलो) : 100-300, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 50-250, गणेश : 20-60, आरक्‍ता 20-80. कलिंगड : 3-7, खरबूज : 10-25, पपई : 5-15, चिकू (10 किलो) 100-600, पेरू (10 किलो) : 350-550, बोरे (10 किलो) चमेली : 2200-250, उमराण : 50-70, चेकनट : 550-600, चण्यामण्या 550-580.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.