जळोची- शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केल्यामुळे एका ३५ वर्षीय महिलेला गरम झाऱ्याचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष दत्तू ढावरे(रा. वारजे माळवाडी, पुणे) याच्या विरोधात कलम ३७६ सह विविध कलमान्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार सदर घटना सन २०१५ ते ८ जुलै २०२० रोजी सायंकाळी चारच्या सुमारास सदर घटना घडली. आरोपी संतोष ढावरे हा माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊन व माझ्याशी जवळीक साधून, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू तुझ्या नवर्याकडे जाऊ नको असे गोडी गुलाबीने बोलून माझ्याशी प्रेम संबंध ठेवून शारीरिक संबंध केले.फिर्यादीने आरोपीस शारीरिक संबंध करण्यास विरोध केला असता, आरोपीने पीडित महिलेच्या हाताला भुवईला, गालाला, पाठीला गरम झाऱ्याचे चटके दिले.
तसेच शारीरिक संबंधाचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करित आहेत.