लाच घेताना पाटबंधारे खात्यातील लिपिक अटक

पेंशन रक्कम निश्‍चित करण्यासाठी मागितले 3 हजार रुपये

नगर – सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित पेंशनची रक्कम निश्‍चित करून त्याचा फरक काढण्यासाठी पेन्शनरकडून 3 हजार रुपये स्वीकारताना पाटबंधारे विभागाचा लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. बुधवार (दि.31) रोजी दुपारी नगर येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

छगन शिवाजी मराठे असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार हे नगर पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचे 7 वे वेतन आयोगनुसार सुधारित पेन्शन निश्‍चिती करून फरक काढण्यासाठी लिपिकाने पेन्शनरकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत पेन्शनरने नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या पथकान पोलीस निरीक्षक श्‍याम पवरे, दीपक करांडे, तनवीर शेख, सतीष जोशी, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, राधा खेमनर, चालक अशोक रक्ताटे यांनी सापळा रचवून पेन्शनर कडून 3 हजार रुपये स्वीकारताना लिपिक छगन मराठे यास रंगेहात पकडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.