राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे स्वच्छता अभियान

पिंपरी – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे स्वच्छ भारत अभियान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संत तुकारामनगर परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेत संघटनेच्या 500 च्यावर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान मेळावा
घेण्यात आला. तरुणांनी यावेळी व्यसन मुक्तीची शपथ घेतली. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दिनेश पाटील, दीपक पाटील, अमोल घोरपडे, खाजामिया शेख, बाबासाहेब सोनावणे आदी उपस्थित होते.

यशवंत भोसले म्हणाले, महात्मा गांधी यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे तरुणांनी अहिंसेच्या मार्गाने जीवन जगावे. तसेच तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ दिली. याप्रसंगी जयदेव अक्कलकोटे यांनी स्वच्छता अभियानावर सुंदर कविता सादर केली. करण भालेकर यांनी
आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.