तुळजापूर – चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे देशात चिंता व्यक्त केली जात असतानाच श्री तुळजापूर मंदिर व मंदिर परिसराची दोन तासांनी स्वछता करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे कोरोनाचा प्रार्दुभाव होवू नये आरोग्य खात्यापाठोपाठा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान ही खबरदारी घेत असल्याने भाविकांनसह शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, स्वछतेच्या कामे हयगय, दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा इषारा स्वछता ठेका कंपनीला तहसिलदार तथा प्रशासकीय व्यवस्थापक योगीता कोल्हे यांनी दिला आहे.