तपास राज्य गुन्हे अन्वेषण अथवा एआयटीकडे वर्ग करा

एस के पाटील सह.बॅंके घोटाळा प्रकरणी हायकोर्टाचा आदेश
मुंबई : आर्थिक गैरव्यवहारामुळे अवसायानात आलेल्या एस के पाटील सहकारी बॅंकेला डबघाईत आणण्यास जबाबदार असलेल्या संचालकांविरोधातील कारवाई करण्यास आर्थिक गुन्हे अन्वेषण अपयशी ठरले आहे.

सत्र न्यायालाने आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही आरोपी मोकाट आहेत, असा आरोप करून या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करावा अथवा विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून तपास करावा, असे राज्य सरकार जिल्हा पोलीस प्रमुख तसेच आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेला नोटीस बजावण्याचे आदेश देवून याचिकेची सुनावणी 20 फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.

कोल्हापूर जिल्हा कुरुंदवाड येथील दहा वर्षांपूर्वी 2008मध्ये संचालकांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे अवसायाना आलेल्या एस के पाटील सह. बॅंकेत ठेवण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून कुरूंदवाड येथील जयप्रकाश पतसंस्था आणि ए.पी.पाटील सर्वोदय पतसंस्थेच्या वतीने ऍड. धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.