श्रीनगर – काश्मिरात पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी आज ठार झाले. त्या जिल्ह्यातील तिक्केन भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली त्यावेळी तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांशी सुरक्षा जवानांची चकमक उडाली त्यात हे तीन जण जागीच ठार झाले.
या चकमकीत एक नागरीकही जखमी झाला आहे. ठार झालेल्या जवानांची ओळख अद्याप पटलेली नाही. ते काम सुरू करण्यात आले आहे.
या चकमकीच्यावेळी दोन दहशतवादी लगेच ठार झाले पण तिसऱ्या एका दहशतवाद्याने एका इमारतीचा आश्रय घेऊन सुरक्षा जवानांशी प्रतिगोळीबार करून मुकाबला सुरू केला होता. पण त्यालाही लवकरच टिपण्यात जवानांना यश आले आहे. या परिसराची नाकेबंदी करून ही कारवाई करण्यात आली.