सुकमा – छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि बॅरल ग्रेनेड लॉंचर जप्त करण्यात आले आहे. या चकमकीत 5 ते 6 नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे.
सुकमाच्या सकलेर भागात सकाळी 4 वाजता चकमक झाली. कोब्रा बटालियन आणि एसटीएफच्या संयुक्त पथकासोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. चकमकीनंतर कोब्रा, एसटीएफ आणि सीआरपीएफचे पथक नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत.
कोब्रा 208 आणि एसटीएफचे संयुक्त पथक डबामार्क छावणीतून सकलरच्या दिशेने नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. त्यानंतर सकाळी 7 वाजता सुकमाच्या सकलेरजवळ नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. 5 ते 6 नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे. मोठ्या प्रमाणात बीजीएल आणि इतर नक्षलवादी स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.