आग्रा – ट्रेन किंवा बस पकडण्यासाठी प्रवाशांमध्ये हाणामाऱ्या नेहमीच होत असतात परंतू तुम्ही कधी ट्रेन चालविण्यासाठी पायलटमध्ये हाणामारी झाल्याचे कधी ऐकले किंवा पाहीले आहे का ? होय अशी हाणामारी झाली आहे. आलिशान वंदेभारत एक्सप्रेस चालविण्यासाठी चक्क रेल्वेच्या लोको पायलटमध्ये हाणामारी जुंपल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ आलिशान वंदेभारत एक्सप्रेसच्या ड्रायव्हर केबिनमध्ये चढण्यासाठी लोको पायलट झटापट करताना दिसत आहे. आग्रा आणि कोटा विभागात लोको पायलटमध्ये ही आलिशान वंदेभारत चालविण्यासाठी अक्षरश: एकमेकांच्या कपडे फाडे पर्यंत लोको पायलटमध्ये युद्ध झाले आहे.
वंदेभारत ट्रेन तिच्या अत्याधुनिक फिचर आणि वेगासाठी ओळखली जाते. भारताची ही ट्रेन पहिली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून गणली जाते. बुलेट ट्रेनला देशी पर्याय म्हणून वंदेभारतकडे पाहीले जाते. देशात शंभरहून अधिक वंदेभारत सध्या धावत आहेत.
पहिली वंदेभारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी मार्गावर साल २०१९ मध्ये धावली होती. आता देशात शंभर हून अधिक वंदेभारत एक्सप्रेस सुरु आहेत. या वंदेभारत एक्सप्रेस बहुतांशी पर्यटन आणि देव दर्शनासाठी चालविल्या चालत आहेत.
बीईएमएल कंपनीची स्लीपर वंदेभारत तयार
अलिकडेच रेल्वेने वंदेभारतचा स्लीपर कोच देखील प्रवाशांच्या सोयीसाठी आणला आहे. स्लीपर कोच वंदेभारत राजधानीच्या मार्गावर चालविली जाण्याची शक्यता आहे. चेअर कार वंंदेभारत आयसीएफ चेन्नई मध्ये तयार झाली होती.
तर नवीन स्लीपर वंदेभारत बंगलोरच्या बीईएमएल कंपनीने तयार केली आहे. ही स्लीपर वंदेभारत मुंबई ते दिल्ली मार्गावर चालविण्यात येईल असे म्हटले जात आहे. तरीही नेमका मार्ग अद्याप उघड करण्यात आलेला नाही.