मुंबई – बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्यात चांगलेच यशस्वी ठरत आहेत. गेल्या 2-3 वर्षांमध्ये त्याचे चित्रपट एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. पुढच्या वर्षीदेखील त्याचे बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर त्याच्या चित्रपटाची टक्कर सलमान खानच्या चित्रपटाशी होणार आहे.
All set for #Eid2020… Akshay Kumar in #LaxmmiBomb… Costars Kiara Advani… Directed by Raghava Lawrence… Fox Star Studios presentation. pic.twitter.com/yLhuEz7okf
— taran adarsh (@taran_adarsh) November 2, 2019
दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा चित्रपट हमखास प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मात्र, पुढील वर्षी त्याच्या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या चित्रपटाशी होणार आहे. अलिकडेच सलमान खानने त्याच्या ‘राधे’ चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट देखील ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर दोघांच्याही चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
The clash is on… #SalmanKhan versus #AkshayKumar… #Radhe versus #LaxmmiBomb. #Eid2020
— taran adarsh (@taran_adarsh) November 2, 2019
यावर्षीच्या दिवाळीमध्ये अक्षयचा ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या चांगली कमाई करत आहे. तर, सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पुढच्या वर्षी देखील अक्षय कुमार, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात झळकणार आहे.