निवडणूक लढण्यासाठी हक्काचे चिन्ह मिळाले – नारायण राणे

मुंबई – खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘बादली’ चिन्ह मिळाले आहे. याबाबत आज ‘मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात’ नारायण राणे घोषणा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे म्हणाले की, आमचा पक्ष येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शक्ती लावून लढणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु झालेली आहे. आज आम्हाला निवडणूक लढण्यासाठी हक्काचे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे, याची अधिकृत घोषणा आम्ही आज करणार आहोत.

कोकणवासीयांच्या मेळाव्याला मुंबईतील सर्व कोकणी माणसे उपस्थित राहणार आहेत. मुंबईकर कोकणवासीय मेळाव्याला नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)