कुटीस बायोटेक कंपनीकडून तक्रार
पुणे – करोनारोधक “कोविशिल्ड’ ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमार्फत लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच लसीच्या “कोविशिल्ड’ नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. नांदेड येथील कुटीस बायोटेक कंपनीने याबाबत पुण्यातील न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी याबाबत सीरमला नोटीस बजावली आहे.
कुटीस बायोटेक कंपनीच्या संचालिका अर्चना आशिष काब्रा यांनी याप्रकरणी सीरम
संस्थेविरोधात ऍड. आदित्य सोनी यांचेमार्फत न्यायालयात ही तक्रार दिली आहे. कुटीस बायोटेक कंपनी हॅंड सॅनिटायझर, फ्रुटस ऍण्ड व्हेज वॉशिंग लिक्विड, अँटीसेपटीक लिक्विड, सरफेस डीकन्टामेंट स्प्रे ही उत्पादने बाजारात “कोविशिल्ड’ ब्रॅंडच्या नावाने विक्री करत आहे.
29 एप्रिल 2020 रोजी फार्मासक्युटिकल उत्पादने विक्रीसाठी अर्ज केला आणि 30 मे 2020 रोजी कोविशिल्ड ट्रेडमार्कने उत्पादने विक्री सुरू केली.
कोविशिल्ड नावाचा वापर सुरू केला असून, सीरमने त्यांचे लसीकरिता दुसऱ्या नावाचा विचार करावा, अशी मागणी केल्याचे ऍड. सोनी यांनी सांगितले.