स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

मुख्य परीक्षेतून 3 हजार 671 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र

पुणे(प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभिायंत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी 3 हजार 671 उमेदवारांनी निवड झाली आहे.

आयोगातर्फे दि. 24 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे जिल्हा केंद्रावर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा आज निकाल जाहीर करण्यात आला. एकूण 1 हजार 145 पदांसाठी ही परीक्षा झाली. मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवानरांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे आणि मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात आला आहे. हा निकाल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या निकालात अपात्र ठरलेल्या उमदेवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची सुविधा आहे. त्यासाठी उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या तारखेपासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे, असेही आयोगाने म्हटले आहे. सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.