कबीर बोबडे
नगर – गावांच्या लोकसंख्येत वाढ झाली की ग्रामपंचायतीची नगर परीषद होते आणि त्यापुढे जसजसा गावाचा विकास होईल त्यानुसार लोकसंख्येच्या घनते नुसार पुढील वाटचाल सुरू होते यालाच शहरीकरणाकडे वाटचाल म्हणता येईल मात्र शहराकडे वाटचाल करतांना शहराला साजेश्या मूलभूत सुविधाही मिळणे गरजेचे आहे. मात्र, केवळ लोकसंख्येची वाढ म्हणजे शहरीकरण नाही. शहरीकरणाच्या बरोबरीने त्या शहराचा विकासही महत्वाचा असतो.
मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते, वाहनव्यवस्था, शाळा, शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी गोष्टी देण्यासाठी आणि शहराचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्नशील असतात. आज नगर हे निमशहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ राज्यात सगळ्यात मोठे क्षेत्रफळ आहे.
या शहराची लोकसंख्याही मोठी आहे. मात्र, या गावाला दर्जा शहराचा असूनही पाहिजे तसा या शहराचा विकास झाला नाही. शहरीकरण आणि विकास हे बरोबरीने होत असतात. नगरमध्ये विकास होतांना दिसत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकले नाहीत. शहरातील लोकसंख्येला सोयी सुविधा पुरवण्यासाठी कोणत्या योजना पुरवायला हव्यात, याचा विचार शहरीकरण प्रक्रियेत केला जातो. मात्र, आज नगरला शहराचा दर्जा असूनही इथे चांगले रस्ते नाहीत. सिटी बस देखील अलीकडेच सुरू झाली.
पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रस्ते, शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचरा विल्हेवाट हे या शहराचे प्रश्न आहेत, गेली कित्येक वर्षे आहे, तसेच आहेत. शहरामध्ये सध्याच्या लोकसंख्येला असलेला पाणी पुरवठा, मलनि:सारण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यांची मोठया प्रमाणत कमतरता भासते. इतर शहरांच्या तुलनेत नगर शहराचा विकसाचा वेग खूपच मंद असल्याची भावना नगरकरांनी व्यक्त केली.
नगर हे निमशहर आहे. इथे मनपा प्रशासन आहे तरीही आपल्या मूलभूत सुविधांच प्रशासन पूर्ण करू शकल नाही. नगरचं शहरीकरण न होण्याला, विकासाला खीळ बसण्याला स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. शहरीकरणाच्या प्रक्रियेत आपण खूप मागास आहोत.
भैरवनाथ वाकळे ,राजकीय- सामाजिक कार्यकर्तेशहरीकरणामुळे इतर सोयी-सुविधांबरोबरच शिक्षणाचा दर्जा सुधारल्या जाऊन, रोजगार उपलब्ध होत असतो, मात्र नगरच्या बाबतीत हे होतांना दिसत नाही. एकीकडे आपण म्हणतो, शहरीकरणं होत आहे, पण प्रत्यक्षात मात्र नगर विकासाच्या बाबतीत बकाल झालेलं आहे.
संजय बंदिष्टी, उद्योजक