शहराचा पाणीपुरवठा आज व उद्या विस्कळीत

पिंपरी: रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या मीटरिंग किऑस्कमध्ये मंगळवारी सकाळी बिघाड झाला. त्यामुळे रावेत येथील संपूर्ण पंपिंग बंद पडले आहे.

पर्यायाने, पिंपरी-चिंचवड शहराचा आज दुपारपासून तसेच सायंकाळचा पूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. तसेच, बुधवारी (दि. 23) सकाळचा देखील पाणीपुरवठा विस्कळित राहील, असे महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

महावितरणमार्फत मीटरिंग किऑस्कच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर समन्वयाने सुरू आहे. ही दुरूस्ती झाल्यावर लवकरात लवकर पंपींग चालू केले जाईल. तसेच, पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपुन वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.