“नगर अर्बन’ची उत्तुंग भरारी

नगर – नगर अर्बन बॅंक जिल्ह्यातील एकमेव मल्टीस्टेट शेड्यूल्ड बॅंक असून सभासदसंख्या 1 लाख 10 हजारांच्या वर आहे. उलाढाल मागील वर्षीच 2 हजार कोटींच्या वर गेली असून, करबचत ठेव योजना असलेली ही एकमेव सहकारी बॅंक आहे. आम्ही सामाजिक दायित्वातून सर्व राष्ट्रीय जनभावना कार्यक्रम साजरे करतो. अशी माहिती नगर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष, खासदार दिलीप गांधी यांनी दिली. खा. गांधी म्हणाले, या वर्षी सभासदांचा 50 हजार रमकमेचा आरोग्यविमा विनाशुल्क उतरवला आहे. नव्या युगाच्या आव्हानानुसार अर्बन ने स्वत: च्या थ्री टायर सेंटरची दिमाखदार इमारत उभारली असल्याने, ग्राहकांना अद्ययावत बॅंकिंग सेवा-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

गेल्या पाच-सहा दशकांपासून शहरासह नगर जिल्ह्यात एकीकडे साखर कारखाने, सहकारी गिरण्या, बॅंका, पतसंस्था यांचे भक्कम जाळे आहे. तरी विशेषत: आपल्या नगरचा दक्षिण भाग मोठी प्रगती करू शकला नाही. अवर्षण, पाण्याचे नियोजन नाही, पुणे, औरंगाबाद, नाशिकप्रमाणे उद्योग-कारखान्यांची वानवा, राजकीय इच्छाशक्तीची उणीव यांसारख्या प्रश्‍नामुळे नगरला आर्थिकदृष्ट्या मागासच राहावे लागले. या परिस्थितीत नगर अर्बन बॅंकेने केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील एकूण 47 शाखांतून गरजू सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वतोपरी सह्या देवून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अगदी भाजीविक्रेते, हातगाडीवर व्यवसाय करून स्वकष्टाने उभे राहू पाहणाऱ्यांना अर्बन ने कर्जे दिली.

या सर्वसमान्यांषह उद्योग उभे करू पाहणारे, छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना कर्जसाह्य देवून व्यवसायाबरोबर सामाजिक जाणिवेचे भान बॅंकेने नेहमीच जपले आहे. वरिल मुख्य मुद्यांसह मागील दोन-तीन वर्षांच्या दुष्काळामुळे, बदलत्या परिस्थितीनुरूप सर्वत्र काहीशी आर्थिक मंदी जाणवली. दुष्काळामुळे आधीच समस्याग्रस्त झाला. यामुळे संपूर्ण बॅंकींग विश्‍वाला कमी नफा, वाढत्या अनुत्पादित कर्जांना गांभीर्याने सामोरे जावे लागते आहे. तरी पण आम्ही आमचे प्रशासन व कर्मचारीवृदांसह यासाठी कसोशीने कार्यरत आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.