नगर – पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून अपहरण करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी शिंगोरी (ता. शेवगाव) येथील आरोपींचा अटकपूर्वक जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर करण्याचा आदेश पारित केलेला आहे.
शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील भागवत काशिनाथ चेमटे यांनी अवैध वाळूचा साठा तहसीलदार यांना पकडून दिला. व त्यामुळे तहसीलदारांनी दंड केला. तसेच तो ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये वारंवार हस्तक्षेप करतो, याचा मनात राग धरून शिंगोरी येथीलच दुसऱ्या गटाने भागवत याचे अपहरण करून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्यामध्ये त्याचा भाऊ सोडवण्यासाठी आला असता त्याच्यावर देखील हल्ला करण्यात आला त्याप्रकरणी सदरील भागवत चेमटे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत नऊ आरोपी विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी पैकी काही आरोपींनी गुन्ह्यांमध्ये आमचा सहभाग नाही, त्यामुळे आम्हास अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये अर्ज सादर केला होता. सदरील अर्जावर मूळ फिर्यादी भागवत चेमटे यांचे वतीने अॅड. गोरक्ष पालवे यांनी हरकत घेऊन सदरचा गुन्हा कट रचून करण्यात आलेला असून सदरील गुन्हा अपहरण करून तीन ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे तो अनेकांनी पाहिलेला असून दहशतीचे वातावरण सदरील आरोपी विषयी निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही आरोपीस सहभागाबद्दल या सुरुवातीच्या तपासा दरम्यान स्वतंत्र रोल देता येणार नाही.
त्यामुळे सदरचा गुन्हा समाज विघातक स्वरूपाचा असल्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्याकामी युक्तिवाद केला. याप्रकरणी युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश दैठणकर यांनी आरोपी यांचा अटक पूर्व जामिन अर्ज नामंजूर केला. अॅड पालवे यांना अॅड रोहित बुधवंत, राजेश खळेकर, गुरविंदर पंजाबी, सागर गर्जे, अंकिता सुद्रिक, धनश्री खेतमाळीस, राहुल अंबरीत, बाळकृष्ण गीते यांनी सहाय्य केले.