नगर, राहुरीतून सुजय विखेंना मोठे मताधिक्‍य

नगर  – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे आघाडी घेतली ती शेवटच्या 23 व्या फेरीपर्यंत कायम होती. सहा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी ही आघाडी मिळवली असली तरी सर्वाधिक मताधिक्‍य नगर व राहुरी मतदारसंघातून मिळाले आहे. विखेंसह राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना फेरीनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहे. नगर लोकसभा निवडणुकीत पहिल्या फेरीपासून भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती. विखेंना 29 हजार 703 मते मिळाली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे आमदार संग्राम जगताप यांना 17 हजार 990 मते मिळाली. या फेरीत विखेंनी 11 हजार 713 मतांची आघाडी घेतली.

दुसऱ्या फेरीपर्यंत विखेंना 58 हजार 22 तर जगताप यांना 33 हजार 857 मते मिळाली. या फेरीत 12 हजार 452 मतांची आघाडी घेवून दुसऱ्या फेरीपर्यंत विखेंनी 24 हजार 165 मते मिळाली. दुसऱ्या फेरीचा विचार केला तर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात जगताप यांना आघाडी मिळाली. मात्र विखेंना राहुरी, नगर, विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली. तिसऱ्या फेरीपर्यंत विखेंना 87 हजार 942 तर जगताप यांना 50 हजार 684 मते मिळाली. या फेरीत 13 हजार 93 मतांची आघाडी घेवून या फेरीपर्यंत 37 हजार 258 मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीपर्यंत विखेंना 1 लाख 15 हजार 751 तर जगताप यांना 65 हजार 666 मते मिळाली.

या फेरीत 12 हजार 827 मतांची आघाडी घेवून विखेंनी या फेरीअखेर तब्बल 50 हजार 85 मतांची आघाडी मिळविली. राहुरी, नगर शहरातून विखेंना मोठी आघाडी मिळत होती. त्या तुलनेत अन्य पारनरे, कर्जत-जामखेड, श्रीगोंद्यामधून दोन ते अडीच हजार मतांची आघाडी मिळाली. जगताप यांना शेवगाव पाथर्डीने तारले असून आतापर्यंतच्या चारही फेऱ्यात जगताप यांना एक ते दीड हजार मतांची आघाडी मिळाली. पाचव्या फेरीपर्यंत विखेंना 1 लाख 44 हजार 841 मते मिळाली तर जगताप यांना 82 हजार 748 मते मिळाली. या फेरीअखेरीस विखेंनी 62 हजार 93 मतांची आघाडी घेतली.

सहाव्या फेरीपर्यंत विखेंना 1 लाख 73 हजार 725 तर जगताप यांना 99 हजार 55 मते मिळाली. या फेरीत विखेंना 28 हजार 884 तर जगताप यांना 16 हजार 307 मते मिळाली. विखेंनी 74 हजार 670 मतांची आघाडी घेतली. सातवी फेरी जगतापांसाठी बरी राहिली. या फेरीत विखेंना केवळ 1 हजार 348 मतांची आघाडी मिळविता आली. या फेरीत विखेंना 24 हजार 372 तर जगताप यांना 23 हजार 24 मते मिळाली.त्यामुळे या फेरीअखेरपर्यंत विखेंना 76 हजार 18 मतांची आघाडी मिळाली. आठव्या फेरीपर्यंत विखेंनी 87 हजार 849 मतांची आघाडी घेतली. या फेरीपर्यंत विखेंना 2 लाख 26 हजार 866 मते मिळाली तर जगतापांना 1 लाख 39 हजार 17 मते मिळाली. नवव्या फेरीत देखील विखेंनी आपली आघाडी कायम ठेवली. या फेरीअखेरनंतर विखेंनी 1 लाख 398 मतांची आघाडी घेतली. विखेंना 2 लाख 56 हजार 329 तर जगतापांना 1 लाख 55 हजार 931 मते मिळाली. पाचव्या फेरीपर्यंत जगतापांना शेवगाव – पाथर्डीमधून आघाडी होती. ती सहाव्या फेरीपासून विखेंना मिळू लागली. सातव्या फेरीत नगर शहरातून जगतापांना आघाडी मिळाली. 4 हजार 824 मतांची आघाडी मिळाली.

दहाव्या फेरीनंतर विखेंना 2 लाख 87 हजार 565 तर जगतापांना 1 लाख 72 हजार 543 मते मिळाली.1 लाख 15 हजार 22 मतांची आघाडी मिळाली. या फेरीत 14 हजार 624 मतांची आघाडी मिळाली. अकराव्या फेरीत 1 लाख 24 हजार 302 मतांची आघाडी विखेंना मिळाली. याफेरीनंतर विखेंना 3 लाख 14 हजार 740 तर जगतापांना 1 लाख 90 हजार 438 मते मिळाली. या फेरीत श्रीगोंद्यात दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये 187 मतांची तफावत होती. ती मते विखेंना मिळाली. बाराव्या फेरीनंतर विखेंना 3 लाख 46 हजार 447 तर जगताप यांना 2 लाख 6 हजार 323 मते मिळाली. विखेंनी या फेरीनंतर 1 लाख 40 हजार 124 मतांची आघाडी घेतली. तेराव्या फेरीत विखेंनी 1 लाख 52 हजार 650 मतांची आघाडी घेतली. विखेंना 3 लाख 74 हजार 196 तर जगताप यांना 2 लाख 21 हजार 546 मते मिळाली. यात फेरीत सर्व विधानसभा मतदारसंघातून विखेंना आघाडी मिळाली. चौदाव्या फेरीत विखेंनी आघाडी कायम ठेवली.या फेरीपर्यंत विखेंना 4 लाख 2 हजार 289 तर जगताप यांना 2 लाख 38 हजार 348 मते मिळाली.

यात विखेंनी 1 लाख 63 हजार 941 मतांची आघाडी घेतली. 15 व्या फेरीत 1 लाख 78 हजार 151 मतांची आघाडी विखेंनी घेतली. या फेरीनंतर त्यांना 4 लाख 32 हजार 497 तर जगतापांना 2 लाख 54 हजार 346 मते मिळाली. 16 व्या फेरीत विखेंना 4 लाख 57 हजार 934 तर जगताप यांना 2 लाख 72 हजार 693 मते मिळाली. या फेरीतही विखेंनी मताधिक्‍य कायम ठेवूत 1 लाख 85 हजार 241 मतांची आघाडी घेतली. साधारण विखेंना प्रत्येक फेरीत 10 हजार मतांची वाढ मिळाली. 17 व्या फेरीत 1 लाख 95 हजार 280 मतांची आघाडी विखेंना मिळाली. 18 व्या फेरीत तर 2 लाख 3 हजार 957 मतांची वाढ झाली. या फेरीनंतर विखेंना 5 लाख 13 हजार 563 तर जगताप यांना 3 लाख 9 हजार 606 मते मिळाली. 19 व्या फेरीत विखेंना 2 लाख 16 हजार 364 मतांची आघाडी मिळाली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.