Dainik Prabhat
Sunday, June 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

खड्डे, डबकी, खडी अन्‌ मुरूमाचे शहर !

by प्रभात वृत्तसेवा
August 9, 2019 | 8:55 am
A A
खड्डे, डबकी, खडी अन्‌ मुरूमाचे शहर !

ऐन पावसात पालिकेची रस्त्यावरील खड्डे भरण्याची तयारी सुरू

सातारा –  अनेक ठिकाणी महापुराने दैना केली असली तरी सातारा शहरात पूर नाही. कमीजास्त प्रमाणात पाऊस असला तरी पालिकेने मोका साधत रस्त्यावर खडी मुरूम टाकत खड्ड्यांचे पॅचिंग करण्याची तयारी केल आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अशी खडी व मुरूमाचे ढिग दिसू लागले आहेत. खड्डे मुरूमाच्या रस्त्यांचा साताऱ्यातील हा प्रयोग नवा नाही. त्यालाही मोठा इतिहास आहे. 

पाटण, कऱ्हाड तालुक्‍यात तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजविला आहे. सातारा शहराला पुराचा धोका नाही. तसा सातारकरांना कोणताच धोका नाही. संततधार पाऊस पडत राहतो. तरी पावसाचे पाणी डोंगरउताराने वाहून जाते. पुराच्या संकटात मदत करण्यासाठी एनडीआरएफसारख्या किंवा इतर सामाजिक संस्था धावून येतात. अर्थाच साताऱ्यासारख्या ठिकाणी अशा मदतीची गरजच भासत नाही. तिकडील लोकांना सुरक्षिततेसाठी पुरातून मार्ग काढावा लागतो. साताऱ्यातील लोक खड्ड्यांतून आणि अर्धवट भरलेल्या डबक्‍यातून मार्ग काढत राहतात. नगरपालिकेच्या कृपेने छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जात मोठ्या कौशल्याने सातारकर खड्डे चुकवत झिगझॅग नक्षी रंगवत वाहतूक सुरू ठेवतात.

शहर ऐतिहासिक, खड्डे ऐतिहासिक, डबकी ऐतिहासिक आणि इथं जगणारी माणसंही तशीच. सहनशील “ठेविले तैसेची अनंत राहवे,’ या उक्तीप्रमाणे वर्षानुवर्षे जगणारी. बरं, शहरात रस्ते तयार होत नाहीत, असेही नाही. रस्त्याचा इतिहास दरवर्षी नव्याने घडवला जातो. कारण ते इतके तंदुरूस्त असतात की दुसऱ्या वर्षी पुन्हा ते बनवावे लागतात. शहरातील कोणत्याही रस्त्यावरून तुम्ही सुरक्षित जाऊ शकता. कारण गुळगुळीत रस्त्यावरून अपघाताची शक्‍यता वाढते. प्रत्येक रस्त्यावरील खड्डे तुम्हाला अधिक सशक्त बनवितात. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी साठते. डबकी तयार करण्याची ही कृती या शहरात अधिक कौशल्यपूर्णरित्या बनवली आहे. त्यासाठी इथले लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्ग नेहमीच तत्पर राहतात.

दरवर्षी रस्ते तयार करण्याची मुदत सर्वसाधारणपणे 15 मे पर्यंत असावी, असा नियम सर्वत्र असतो. साताऱ्याला तो लागू नाही. पावसाळा तोंडावर आला की जूनमध्ये पालिकेला अशा कामांचीं आठवण आल्याशिवाय राहत नाही. लगबगीने कामे उरकली जातात. तेवढ्यात पाऊस सुरू होतो. त्यामुळे काम करणाऱ्यांचाही नाईलाज असतो. त्यावेळी जसे रस्ते तयार होतात. तसेच ते वर्षभर चालतात. त्यामुळे पावसालाही काही कळत नाही. तो वेड्यासारखा पडत राहतो. रस्त्यावर खड्डे तयार करतो. खड्ड्यात डबकी तयार होतात. त्यात पालिकेची चूक आहे, असा ओरडा काही लोकं उगाचच करतात. बरं, लोकांची तशी काही तक्रार नसते. ते आपले निमूटपणे आपले वाहन सांभाळत खड्डे चुकवित मार्गक्रमण करीत राहतात.

लोकांचे मणके ढिले झाले तरी ते शांतपणे डॉक्‍टरांकडे जाऊन उपचार करून घेतात. वाहनांचा तर प्रश्‍नच नाही. लोकांना बोलता येते म्हणून त्यांना होणाऱ्या दुखापती समजतात तरी. मुक्‍या वाहनांच्या वेदना अबोलच राहतात. तरीसुद्धा पालिकेला काळजी वाटत राहते. मग ऐन पावसात खडी आणून रस्त्याकडेला ओतली जाते. एखाद्या डंपरमधून मुरूम आणून टाकला जातो. पाऊस सुरू असल्यामुळे झटकन खड्डे भरण्यातही अडचणी असतात. मग खडी आणि मुरूम काही दिवस पडून राहिल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्याच्या लक्षात येते की अरे ते काम राहिलेच आहे. मग तो येतो. खडी आणि मुरूम खड्ड्यांची जागा भरून काढतो.

एखादा दिवस लोकांनाही बरे वाटते. पावसाला मात्र कळतच नाही. तो पुन्हा बरसत राहतो. खडी मुरूम वाहून नेतो. काही खड्डे एवढे मोठे असतात की छोट्या मोठ्या अपघातांची त्याला सवयच लागून जाते. स्टेडियमजवळच्या खड्ड्यात तर एका महिलेची दुचाकी मधूनच मोडते. एखादा टेंम्पो पलटीही होतो. खड्ड्याला मात्र काहीच त्रास होत नाही. इतकी काळजी त्या खड्ड्याची इतरत्र कुठेही घेतली जात नसावी. एखाद्या शहराच्या इतिहासातून इतर अनेकजण काही बोध घेत असतात.
सातारा पालिकेकडून घडविल्या जाणाऱ्या या खडी मुरमाचा इतिहास असाच अनुकरणीय आहे.

नेमेची येतो पावसाळा याची कल्पना असल्यामुळे दरवर्षी त्याच पद्धतीने खडी, मुरूमाच्या मुलाव्याने इथले रस्तेही अधूनमधून सजत राहतात. ही सजावट शहराला साजेसी बनते. त्याशिवाय काटकसरही मोठीच होते. म्हणजे रस्त्यासाठी मोठा निधी आला असे जाहीर होत असते. प्रत्यक्षात तसे रस्ते दिसत नसल्यामुळे या निधीची बचतही होत असणारच. म्हणूनच या खडीमुरूमाचा प्रयोग खूप महत्त्वपूर्ण आहे. परदेशात रस्त्यांच्या कामाबात मोठे संशोधन होत असल्याचा गवगवा होतो. कुठे टाकाऊ प्लॅस्टिकपासून रस्ते बनतात. कुठे आणखी कशापासून. पण खडी मुरूमापासून स्वस्तात स्वस्त रस्त्यांच्या उपायाचा प्रयोग मात्र दुर्लक्षित राहतो.

Tags: satara city news

शिफारस केलेल्या बातम्या

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक
व्हिडीओ

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

5 months ago
सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील
latest-news

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

1 year ago
सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा
latest-news

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

2 years ago
latest-news

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#SLvIND : भारतीय महिला संघाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 5 विकेट्‌सने मात

‘शाहू छत्रपती’ चित्रपट मराठीसह सहा भाषेत ! न्यू पॅलेस येथे पोस्टरचे अनावरण

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या फॅशन ब्लॉगर महिलेला पतीने इमारतीवरून फेकलं

आमदारांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील घडामोडींसाठी भाजपच जबाबदार; कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ; गेल्या 24 तासांत 15 हजार 940 रूग्ण

शिवसेनेच्या आणखी चार बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा

आसामातील पुरस्थित अद्याप गंभीरच; सिलचर शहर पाण्याखालीच

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

बांगलादेशातील सर्वात लांब पूलाचे उद्‌घाटन

Most Popular Today

Tags: satara city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!