नगर – सत्तेच्या अडून नराधमांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

नगर – बदलापूरची दुर्दैवी घटना माणूसपणाला काळीमा फासणारी आहे. लहान मुली, महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सत्तेच्या अडून नराधमांना आणि संबंधित संस्था प्रशासनाला पाठीशी घालत वाचविण्याचे पाप सरकार करीत आहे. पीडित मुलींच्या पालकांना बारा बारा तास पोलिसांनी एफआयआर न नोंदवता अन्याय केला. मात्र बदलापूर रेल्वे स्टेशनवर सर्वसामान्य नागरिक असणाऱ्या आंदोलकांनी लोकशाही मार्गाने यावर आपली आंदोलनात्मक प्रतिक्रिया दिली, तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदविले गेली. सत्तेच्या अडून नराधामांना पाठीशी घलण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत, अशी टीका नगर शहर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नगर शहरात महाविकास आघाडीकडून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, मनोज गुंदेचा, सुजित क्षेत्र, विकास भिंगारदिवे, गौरव घोरपडे, मोसीम शेख, शामराव वाघस्कर, चंद्रकांत ऊजागरे, उषाताई भगत आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
पिडीततांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने फास्टट्रॅक विकासाच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. तसेच नगर शहरातील सर्व शाळांमध्ये मुलींची स्वच्छतागृह स्वच्छ असावीत, तिथे साफसफाई करता महिला कर्मचारी असावी याकरिता शालेय शिक्षण विभागाने कठोर पावले उचलावी. प्रत्येक शाळा परिसरात सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करावे. शाळेमध्ये कामकाजासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. शाळेतील मुला, मुलींना गुड टच, बॅड टच याबाबत या विषयातील तज्ज्ञ लोकां मार्फत जनजागृती करणारे विशेष अभियान शहरातील सर्व शाळांमध्ये राबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.





