शहर सुधारणा समिती प्रशासनावर नाराजच

पालिका प्रशासनाचा कारभार मंदावला

पुणे- शहर सुधारणा समितीने अभिप्रायासाठी पाठविलेल्या 23 पैकी फक्‍त 2 प्रस्तावांवर महापालिका प्रशासनाने अभिप्राय दिला आहे. त्याचे पडसाद शहर सुधारणा समितीच्या बैठकीत उमटले. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या प्रकाराची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर सुधारणा समितीच्या मार्फत विविध प्रस्ताव दाखल केले जातात. नवीन समितीची रचना झाल्यापासून जुलैपर्यंतच्या चार महिन्यांत अनेक प्रस्ताव दाखल करण्यात आले. सत्ताधारी भाजप सभासदांबरोबरच विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सभासदांनी हे प्रस्ताव दिले आहेत. यामध्ये वाहतुकीची सतत कोंडी होत असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, काही भागात नव्याने रस्ते तयार करणे, नवीन उड्डाणपूल बांधणे अशा विविध विषयांचा समावेश आहे. पण, हे विषय नागरिकांच्या हिताचे असतात. त्यामुळे प्रशासनाने यावर कमीतकमी वेळेत आपला अभिप्राय देणे अपेक्षित असते. त्यानंतर पुढील कार्यवाही होऊन विषय मार्गी लागतात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अभिप्राय दिले जात नसल्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)