पुणे – सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये रविवारी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर देशभरात राजकीय, सामाजिक क्षेत्रातून विरोध होत आहे.
यातच आता पुणे येथील डेक्कन जिमखाना तसेच गुडलक चौकात काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली काळे फडके बांधून निदर्शने व उपोषण आंदोलन सुरु आहे. दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे.