पिंपरी : बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल दिू समाजाच्या वतीने शहराच्या विविध भागांत रविवारी (दि.8) सायंकाळी निदर्शने करण्यात आली. यामध्ये विविध हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी जाले होते.
या निदर्शनादरम्यान बांगलादेशा सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनामध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय रोखण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ‘बटेंगे तो कटेंगे’,‘हिंदुओंपर अन्याय, हमे रक्षाका अधिकार’ असे अनेक फलक झळकविण्यात आले.