रेडा -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी देण्यात येत असलेले ओपन जीमचा नागरिकांना लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर खूप फायदा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
इंदापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये माता तुळजाभवानी मंदिरासमोर राज्यमंत्री भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गारटकर, नगरसेवक स्वप्नील राऊत व तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या हस्ते ओपन जीमचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी गारटकर बोलत होते.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगरसेवक स्वप्नील राऊत यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांच्याकडे नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जीमची मागणी केली होती. त्याला राऊत यांनी जागा उपलब्ध करून देताच ओपन जीमचे साहित्य देण्यात आले. त्यामुळे तालुक्यात क्रीडा विभागाचे कामकाज उत्कृष्ट चालले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे, अनिल राऊत, युवक कार्याध्यक्ष वसिम बागवान, दत्तात्रय राऊत, जालिंदर राऊत, सुनील राऊत, राघु डाके, महेश जाधव, मगेश वाघमोडे, किशोर उंबरे, रामा राऊत, अनिकेत राऊत, ऋषिकेश कवळे, विशाल राऊत, आकश राऊत, मुन्ना राऊत उपस्थित होते.
क्रीडा अधिकारी महेश चावलेंकडून विकास
इंदापूर तालुका क्रीडा संकुल समितीवर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांची नियुक्ती झाल्यापासून तालुक्यातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यांनी क्रीडा विभागाची सूत्रे हाती घेतली. तालुक्यात ओपन जीमचे साहित्य दिले. संकुलात सुविधा देत विकास केला. त्यामुळे तालुक्यात काम चांगले झाले आहे, असे गौरवोद्गार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.