नागरिकांचा विश्‍वास असलेली क्रेडिट सोसायटी

उत्तमनगर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा आधार व विश्‍वास असलेली क्रेडिट सोसायटी म्हणून उत्तमनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कडे आज पाहिले जाते. सर्वसामान्य नागरिकांना गरजेनुसार कर्जपुरवठा करून त्यांना अडचणीत हात देण्याचे काम सोसायटी कडून करण्यात येत आहे. सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या या उत्तमनगर अर्बनने आपला आठवा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा केला.

उत्तमनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश गुजर यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना सहज कर्ज मिळावे व त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात ह्या हेतूने 2012 मध्ये या क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली. सुरूवातीला चालू केलेल्या जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघाच्या माध्यमातून केवळ बचत गटाच्या सभासदांनाच कर्ज दिले जात होते मात्र इतर नागरिकांना कर्ज देता येत नव्हते म्हणून तेथूनच प्रेरणा घेऊन क्रेडिट सोसायटीची स्थापना केली.

आजपर्यंत हाउसिंग, व्यावसायिक, वैयक्तिक, सोन तारण असे एकूण साडेतीन कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले असून कर्जदरांकडून वेळेवर परतफेड केली जात आहे. सहज कर्ज उपलब्ध होऊ लागल्याने या भागातील नागरिकही समाधानी आहेत. सोसायटीला होणाऱ्या नफ्यातून सामाजिक व शैक्षणिक कार्य केले जाते. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षे अगोदर मार्गदर्शन पर व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांनाही सोसायटीच्या माध्यमातून मदत केली जाते. वारीमध्ये वारकऱ्यांना औषधोपचाराची सोय करण्यात येत असते. लोकांचा क्रेडिट सोसायटी वर विश्‍वास असल्याने स्वतःहून येऊन लोक ठेवी सोसायटीमध्ये ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रेडिट सोसायटीची गुजरातमधील कलुल या ठिकाणी एक शाखा असून सोसायटीचा आणखी विस्तार करून जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांना त्याचा कसा फायदा मिळेल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. क्रेडिट सोसायटी चालवतानाच सामाजिक भान ठेवून लोकोपयोगी उपक्रम राबवण्यावर हि आमचा भर असल्याचे गुजर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.