नवी दिल्ली – देशवासीयांना करोनावरील लस मोफत मिळायला हवी, अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. चर्चा खूप झाली. भारताला भाजपच्या सिस्टिमचा (व्यवस्था) व्हिक्टीम (बळी) बनवू नये, असे ट्विट राहुल यांनी केले. त्यांच्यासह कॉंग्रेस पक्षाकडून सातत्याने मोफत लस पुरवण्याची मागणी होत आहे.
चर्चा बहुत हो चुकी।
देशवासियों को वैक्सीन मुफ़्त मिलनी चाहिए- बात ख़त्म।
मत बनाओ भारत को भाजपा system का victim!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2021
करोना संकटाच्या हाताळणीबरोबरच लसीकरण धोरणावरून कॉंग्रेस केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. देशात 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण 1 मेपासून सुरू होणार आहे. अशात लस उत्पादकांनी राज्य सरकारांसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी वेगवेगळे दर जाहीर केले आहेत. त्यानंतर मोफत लसीच्या मागणीने आणखी जोर धरला आहे.