नवी दिल्ली – एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडाअंतर्गत 18 लाख नागरिकांनी खाते उघडले.
त्यामुळे आता भारतात म्युच्युअल फंडाकडे असलेल्या खात्यांची एकूण संख्या 9 कोटी 15 लाख इतकी झाली आहे. जानेवारी ते मार्च या काळात म्युच्युअल फंडामध्ये उघडलेल्या खात्यांची संख्या 26 लाख इतकी होती.
भारतात सध्या 45 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना गुंतवणुकीच्या संधी मर्यादित झाल्या होत्या. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात खाती उघडली गेली.