आधारजोडसाठी नागरिकांचे हेलपाटे 

तळेगाव ढमढेरे – येथील पोस्ट कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या आधारजोड किंवा अद्ययावत करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे आधारजोड प्रणाली लवकर सुरू करण्याची मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे गेल्या दोन महिन्यांपासून आधार अद्ययावत कार्यक्रम बंद आहे. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना पोस्ट कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक पोस्ट कार्यालयामध्ये गेल्यानंतर दर्शनी बाजुस इंग्लिश भाषेत फलक लावला आहे. येथील नवीन भरती झालेले कर्मचारी यांनी नागरिकांना समजेल, अशा बोलले पाहिजे. त्या अनुषंगाने तळेगाव ढमढेरे येथील सब पोस्टमास्टर प्रिया शैव यांना याबाबत माहिती विचारली असता ते म्हणाले की, पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कामकाज सुरू ठेऊ, असे सांगितले. परंतु या भागातील विद्यार्थी, ज्येष्ठ, नागरिकांची आधार अद्ययावत करण्याची कामे खोळंबली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)