पिंपरी – ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. त्यामुळे महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. जे कोणी 25 नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून व त्यांच्या सोसायटीच्या अध्यक्ष यांनी नजीकच्या महापालिका रुग्णालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
ब्रिटनमधील काही भागात करोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू आढळला आहे. या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात 25 नोव्हेंबर 2020 ते 23 डिसेंबर 2020 या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
जे 25 नोव्हेंबर 2020 नंतर इंग्लंडवरुन पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले आहेत. त्यांनी स्वत:हून व त्यांच्या सोसायटीच्या अध्यक्ष यांनी आपल्या नजीकच्या महापालिका रुग्णालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक 8888006666 वर संपर्क करावे असे आवाहन केले आहे.
माहिती देण्यासाठी संपर्क
युरोपीय देशातून आलेल्या आकुर्डी रुग्णालय डॉ. सुनिता साळवे 9981161255, यमुनानगर रुग्णालय डॉ. प्रकाश ताडे 9922501326, भोसरी रुग्णालय डॉ. शैलेजा भावसार 9922501325, वायसीएम रुग्णालय डॉ. तृप्ती सागळे 8888844208, सांगवी रुग्णालय डॉ. विजया आंबेडकर 9922501353, जिजामाता रुग्णालय डॉ. संगीता तिरुमणी 9922501301, तालेरा रुग्णालय डॉ. सुनिल जॉन 9922501331 आणि थेरगाव रुग्णालय डॉ. सुनिता इंजिनिअर 9922501340 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.