पुणे – करोनाचा संसर्गामुळे शहरात रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश (पाच किंवा त्यांपेक्षा नागरिकांनी एकत्र येणे) लागू करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भादंवि कलम 188 (आदेश धुडकावणे) तसेच साथरोग अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येईल, असे आदेश डॉ. शिसवे यांनी दिले आहेत.
रविवारी (28 मार्च) रात्री आठनंतर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.
दरम्यान, शहरात या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून, प्रमुख रस्तेदेखील निर्मनुष्य दिसत आहेत. तर, पोलीसही गस्त घालत आहेत.